Share

हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत

Published On: 

चेन्नई : कालपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. आयपीएलची टशन यंदा भारतात रंगली. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्समध्ये झाला. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने आपल्या खिशात घातला. सालाबाद प्रमाणे मुंबई सलामीचा सामना हरला. सलामीच्या सामन्यात दोन विकेट्स राखून विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सने मॅच विनिंग खेळी केली. विराट कोहली (33) आणि ग्लेन मॅक्सवेल (39) धावा केल्या. ही दोघे माघारी परतल्यानंतर मॅच मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकली होती. मात्र एबीने 27 चेंडूत केलेल्या 48 धावांच्या जोरावर अखेर बंगळुरुला यश मिळाले.

तत्पूर्वी बंगळुरूकडून जलदगती गोलंदाज हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला होता. या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कालच्या सामन्यात मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा हर्षल पटेल जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएल इतिहासात अशी कामगिरी कोणत्याच गोलंदाजाला करता आली नाही. त्याने आज 4 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे मुंबईविरोधात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड याआधी रोहित शर्माच्या नावावर होता. १२ वर्षाचा रोहितचा रोकॉर्ड रेकॉर्ड मोडीत काढत हर्षल पटेलने हा आपल्या नावावर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!