Share

Vinod Patil | “सावंतांच्या वक्तव्याची तात्काळ दखल घेऊन समज द्यावी, अन्यथा…” ; विनोद पाटलांचा इशारा

Published On: 

मुंबई : तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन मराठा आरक्षणकर्ते आणि विरोधक आक्रमक झाले असून सावंतांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील देखील आक्रमक झाले आहेत.

विनोद पाटील तानाजी सावंत यांच्यावर आक्रमकः

मागील सरकारच्या काळात सावंत यांना मंत्री करण्यासाठी हेच मराठा कार्यकर्ते शिष्टमंडळ घेऊन भेटत होते. कोणत्या ताकदीच्या जोरावर सावंत यांनी एवढ्या खालच्या दर्जाचे वक्तव्य केलं आहे? सावंत यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना समज द्यावी, अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे. राज्यात ५० तरुणांनी बलिदान देऊन मराठा क्रांती मोर्चा उभा केला. सरकार कुणाचंही असलं तरी तरुणांची मागणी तीच असेल, असं पाटील म्हणाले.

आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणीः

यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असं तानाजी सावंत म्हणाले. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं देखील सावंत म्हणाले.

दरम्यान, तानाजी सावंतांनी माफी मागितली असून त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तर हा तानाजी सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाबरोबर मोर्चात तुमच्याबरोबर शामिल होईल, असं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!