Share

BJP | “जनाची नाही तर मनाची लाज बाळगा” ; भाजपचा आदित्य ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्रात महत्वाचा मानला जाणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी सत्ताधारकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. यावर सत्ताधारकांनी स्पष्टीकरण दिलं असून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत. अशातच भाजप पक्षाने देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने लिहलेल्या एका पत्राचा फोटो शेअर करत युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

भाजप पक्षाची आदित्य ठाकरे यांच्यावर टीकाः

आदित्य ठाकरे, जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात व्हावे त्यासाठी काय प्रयत्न केले आपण? उलट तुमच्या निष्क्रियतेमुळे फॉक्सकॉन गेली. BMC च्या हद्दीत मातोश्री-२ बांधणे किंवा वरळीची सीट मिळवणे इतके सोप्पे वाटले का?, असा खोचक सवाल भाजपने आदित्य ठाकरेंना विचारला आहे.

फेसबुक पोस्टः

भाजपच्या फेसबुक अकाऊंटवरुन आदित्य ठाकरेंवर टीका करण्यात आली असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एका पत्राचा देखील फोटो यामध्ये शेअर करण्यात आलं आहे. हे पत्र वेदांता फाॅक्सकाॅनच्या माहिती बाबत पत्र आहे.

आपण आज दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी वडगाव मावळ येथे मा. आ. बाळा भेगडे साहेब व अन्य आमदार महोदय आणि असंख्य कार्यकत्यांसह आंदोलन करत आहात, प्रथमतः आपणास विनंती करण्यात येते की आपण धरणे आंदोलन मागे घ्यावे. आपणास वेदांत फॉक्सकॉन कंपनी बाबतची मा. मुख्यालयाकडून प्राप्त करुन घेतलेली माहिती अशी की, वेदांत फॉक्सकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा अद्याप पर्यंत MOU झालेला नाही. वेदांत फॉक्सकॉन कंपनीस महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. त्यामुळे जागेचा सर्व्हे क्रमांक किंवा अॅग्रोमेन्ट याबाबत माहिती देता येत नाही. माहितीस्तव सविनय सादर. तरी आपण आजचे धरणे आंदोलन मागे घ्यावे, ही विनंती, असं या पत्रात लिहण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!