🕒 1 min read
औरंगाबाद : सध्या महाराष्ट्रात दररोज माझ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या काहीदिवसांपूर्वी वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेला आहे. यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प केंद्राकडून नामंजूर करण्याच आला आले. बिडकीन येथील प्रस्तावित मेडिकल डिव्हाईस पार्क केंद्र सरकार कडून नामंजूर करण्यात आले. मात्र यावरून आता विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. याबाबत ‘महाराष्ट्र देशा’ शी संवाद साधताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.
अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?
निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यात हलवल्या जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते. यावर अंबादास दानवे म्हणाले, गुजरातमध्ये अनेक आव्हाने भाजपसमोर उभी राहीली आहेत. म्हणून रोजगार देण्यासाठी फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग प्रकल्प गुजरातला गेला आहे. तसेच त्यांना लिमिटेड राज्यांमध्ये प्रकल्प द्यायचा असेल. हिमाचलप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, या राज्यात निवडणूक येत आहेत. म्हणून हे प्रकल्प तिकडे नेले असावेत, असा आरोप दानवे यांनी केला आहे.
अंबादास दानवे म्हणाले, “मेडिकल डिव्हाईस पार्क बिडकीन एमआयडीसीच्या ऑरिक सिटी भागात होणार होता. तत्कालीन सरकारने बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस पार्क संदर्भात एकाचवेळी प्रस्ताव सादर केले होते. राज्य सरकारने हे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले होते. पण केंद्र सरकारने महाराष्ट्राचा प्रस्ताव नामंजूर केला. तर चार राज्यांमध्ये हा प्रकल्प देण्यात आला. या संदर्भात खासदार प्रियंका चतुर्वेदी आरोग्यमंत्र्यांना विचारणा केली पण त्यांनी सुस्पष्टपणे महाराष्ट्राचा समावेश नाही, असे सांगितले.”
महाराष्ट्राचे खच्चीकरण-
“त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे बोलतात पुरावा दाखवा, तर हा महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचा प्रस्ताव होता. जो केंद्राने नाकारला आहे. महाराष्ट्रात कशाप्रकारे उद्योगधंदे येणार नाहीत, महाराष्ट्राचे कसे खच्चीकरण होईल, अशाच पद्धतीने दिल्लीची सत्ता काम करते. तसेच राज्यातील सरकार देखील या सगळ्या कामाला मदत करते,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. ते ‘महाराष्ट्र देशा’सोबत बोलत होते.
आदित्य ठाकरे यांचे ट्विट-
रविवारी आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले की, “वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?”
दरम्यान, औरंगाबाद येथील ऑरिक सिटी येथे 424 कोटींचा वैद्यकीय उपकरणे पार्क प्रस्तावित होता. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कनंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेला हा तिसरा मोठा प्रकल्प आहे. राज्याकडून योग्य पद्धतीने प्रस्ताव सादर न केल्याने प्रकल्प नामंजूर करण्यात आला, अशी टीका शिंदे सरकारवर होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Navratri 2022 | बंगालपासून गुजरातपर्यंत अशी होते नवरात्री साजरी
- Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर तानाजी सावंतांवर संतापल्या, म्हणाल्या – “नालायक मंत्र्यांना…”
- Medical Device Park | बिडकीनमध्ये होणारा प्रकल्प इतर राज्यात! अंबादास दानवे आक्रमक, म्हणाले “महाराष्ट्राचे खच्चीकरण…”
- Bikes Comparison | ‘या’ दोन हिरो बाइक्स इतक्या कमी किमतीत आहेत उपलब्ध, कोणती सर्वोत्तम असेल जाणून घ्या!
- Supriya Sule | … म्हणून सुप्रिया सुळेंच्या चालू कार्यक्रमात दोन गट एकमेकांना भिडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
