नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्याने तिला तात्पुरते निलंबित केले आहे. टोकियो गेम्सच्या उपांत्यपूर्व फेरीत बाद झालेल्या विनेशला नोटीसला उत्तर देण्यासाठी 16 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आले आल्याचे कळते. यामध्ये अनुशासनाचे तीन आरोप लावण्यात आले आहेत. विनेशला क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात होते, पण बेलारूसच्या व्हेनेसाने तिला बाद केले.
प्रशिक्षक वोलर इकोससह हंगेरीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विनेशने तेथून थेट टोकियोला उड्डाण केले होते, जिथे तिने स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राहण्यास आणि भारतीय संघाच्या इतर सदस्यांसह प्रशिक्षणाला नकार दिला. तिने भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक शिव नरेशचा पोशाख परिधान करण्यास नकार देत तिने नायकी कपडे परिधान केले होते.
त्यामुळे तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले आणि कुस्तीशी संबंधित सर्व उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. 26 वर्षीय कुस्तीपटूने शुक्रवारी डब्ल्यूएफआयने तिला पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिले. विनेशने माफी मागितली आहे. मात्र माफी मागूनही विनेश फोगटचे निलंबन चालू राहू शकते. माफी मागितली असूनही, तिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रवास करण्याची परवानगी न मिळण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टी -20 विश्वचषकासाठी ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा ; ‘या’ खेळाडूंवर असणार नजर
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

