Share

Vinayak Raut | “एकनाथ शिंदेंनी फडणवीसांविरोधात आकांडतांडव केलं होतं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी समजूत काढली”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यापासून, राज्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, असं चित्र पाहायला मिळतं आहे. दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. अशातच शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले विनायक राऊत ?

एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता. त्यावेळी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती, असं विनायक राऊत यांनी सांगितले. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलत असताना 2014 सालचा राजकीय घटनापट मांडताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला.

एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले, मी त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होतं,असंही त्यांनी सांगितलं.

तसेच, भाजप पक्षाचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे त्यावेळी एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले?, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचलनालयाचे संचालकच सांगू शकतात, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!