Share

Gopichand Padalkar | “कितीही दौरे केले, तरी राज्यात सत्ता येणार नाही”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस महाराष्ट्राचा एक दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी इंरापूरमधील एक सभेमध्ये केलं होतं. त्यावरून भाजप पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादीवर निशाणा –

कितीही दौरे केले, तरी राज्यात सत्ता येणार नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी पक्षाला चांगलाच टोला लगावला आहे. पडळकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे पडळकर असंही म्हणाले की, सुप्रियाताईंनी खरंतर राज्यातल्या लोकांना एक गोष्ट सांगायला हवी. त्यांच्यामागून देशात अनेक लोक आले. ममता बॅनर्जी स्वत:च्या भरंवशावर 3-4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. मायावती 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. समाजवादी पक्षालाही मुख्यमंत्रीपद मिळालं. जगनमोहनसारखा तरुण मुलगा, ज्याच्या वडिलांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं अशा नवख्या मुलानं एकहाती सत्ता आणली. अरविंद केजरीवाल यांनीही एकहाती सत्ता आणली.

तसेच, अरविंद केजरीवाल यांनीही एकहाती सत्ताही आणली. त्यामुळे सुप्रिया सुळेंना हे विचारायला हवं की तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40-50 वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहात, पण राष्ट्रवादी काँग्रेसला तीन अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाहीत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!