Share

Jio Upcoming Mobile | Jio चा 5G फोन लवकर करणार आहे बाजारात एन्ट्री

Published On: 

🕒 1 min read

भारतील आघाडीची मोबाईल निर्माता कंपनी रिलायन्स जिओ लवकरच भारतात 5G सर्विस सुरू करणार आहे. ताज्या अपडेट नुसार पंतप्रधान मोदी 1 ऑक्टोबर रोजी IMC (इंडिया मोबाईल काँग्रेस) येथे Jio 5G सर्विस लाँच करतील. Jio आपल्या 5G सर्विस बरोबरच आपला 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

AGM इव्हेंट 2022 मध्ये मुकेश अंबानी म्हणाले होते की, Jio आणि Google मिळून लवकरच कमीत कमी किमतीचा 5G फोन लाँच करणार आहे. पुढच्या वर्षी हा फोन लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या Jio 5G फोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर लाँच पूर्वीच समोर आली आहे

या फोनची अपेक्षित किंमत

हा फोन बाजारात कमीत कमी किमती मध्ये मिळणार आहे त्यामुळे त्याची किंमत सर्वांना परवडेल अशीच असेल. मीडिया रिपोर्टनुसार या फोनची किंमत 8,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.

या फोनचे स्पेसिफिकेशन

या Jio 5G फोनमध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर असेल, त्याचबरोबर 4GB LPDDR4X रॅम आणि 32GB पर्यंत स्टोरेज असू शकते. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले सुद्धा असू शकतो. बॅटरी बद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये 18W चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी असू शकते.

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले याच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असू शकतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!