Share

Gopichand Padalkar | सुप्रिया सुळेंनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत एक वक्तव्य केलं होतं. अशातच त्यांच्या वक्तव्यावरून भाजप पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सुळेंना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?

सुप्रिया सुळेंना हे विचारायला हवं की तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40-50 वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहात. पण राष्ट्रवादी काँग्रेसला तीन अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाहीत, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी आणि सुप्रिया सुळेंना चांगलंच फटकारलं आहे. पडळकरांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते असंही म्हणाले, सुप्रियाताईंनी खरंतर राज्यातल्या लोकांना एक गोष्ट सांगायला हवी. त्यांच्यामागून देशात अनेक लोक आले. ममता बॅनर्जी स्वत:च्या भरंवशावर 3-4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. मायावती 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. समाजवादी पक्षालाही मुख्यमंत्रीपद मिळालं. जगनमोहनसारखा तरुण मुलगा, ज्याच्या वडिलांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं अशा नवख्या मुलानं एकहाती सत्ता आणली. अरविंद केजरीवाल यांनीही एकहाती सत्ता आणली.

सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य-

दरम्यान, शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस महाराष्ट्राचा एक दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!