🕒 1 min read
मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ, असं केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही आता नारायण राणेंवर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे हे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिंदे शिवसेनेसाठी अभिमान असणारे मंत्री आहेत. आजही ते ताठ मानेने संपूर्ण राज्यात शिवसेनेचं कार्य जोमाने करत आहेत. नारायण राणेंना ठोकम ठोकी करायची सवय आहे. स्वत:च्या अनुभवावरुन इतरांना मोजणं हा नारायण राणेंचा गुणधर्म आहे, अशी टीका विनायक राऊतांनी राणेंवर केली आहे.
जिल्हा नियोजनाची बैठक १० दिवस आगोदर जाहीर केली आहे. नारायण राणेंना काटशह देण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. तसेच कोकणात येणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना गांभिर्याने घेत नाही, असंही राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.
दरम्यान, नारायण राणेंच्या जन आशिर्वाद यात्रेवरुन शिवसेना-भाजपमधील नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फाळणी विसरायची तरी कशी?; ‘सामना’तून मोदींवर बाण
- खळबळ! ‘उपमुख्यमंत्री अजित पवार निधीसाठी साथ देत नाहीत’, काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- अफगाणिस्तानातील भारतीयांना वाचविण्यासाठी अमेरिकेने घेतला ‘हा’ निर्णय
- नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

