Share

फाळणी विसरायची तरी कशी?; ‘सामना’तून मोदींवर बाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : फाळणीचा दिवस विसरू नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फर्मान आहे. पण आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? फाळणीची वेदना आता कशी शांत होणार? मोदींना जर अखंड राष्ट्र करायचेच असेल तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानमधील ११ कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही मोदींनी भाष्य करावं, असं आजच्या ‘सामना’ रोखठोकमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी देशाला आणखी एक नवा कार्यक्रम दिला. १४ ऑगस्ट हा फाळणीचा स्मृती दिवस पाळायचा असे त्यांनी ठरवून टाकले. म्हणजे १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा आनंद सोहळा अणि १४  ऑगस्ट म्हणजे एक दिवस आधी फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा देण्याचा दिवस, असल्याची खोचक टीका राऊतांनी मोदींवर केली आहे.

भारताची फाळणी हा एक भयपट होता. फाळणीच्या वेळी दोन्ही देशांच्या सीमेवरील प्रांतांमध्ये झालेल्या अमानुष हिंसेने स्वातंत्र्याचा पहिला दिवस रक्ताने भिजला होता. लाहोरच्या हिंदी वसाहतीमधील पाणी पुरविणाऱ्या सर्व लाइन्स दंगलखोरांनी तोडल्या होत्या. तेथील लहान मुले, आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण करीत होते, अशी भीषण परिस्थिती १४ ऑगस्टच्या दिवशी झाली होती हे राऊतांनी सांगितले आहे.

फाळणीचे कोणतेही नियोजन नव्हते. कायदा-सुव्यवस्था, माणुसकी रस्त्यारस्त्यावर मुडद्याप्रमाणे पडली होती. या हिंसाचारात  १० लाख लोक मारले गेले. हजारो महिलांनी आपली इज्जत वाचविण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला होता, असं सांगत राऊतांनी फाळणीच्या दिवशीचा प्रसंग रोखठोकमध्ये मांडला आहे.

नराधमांच्या हाती लागून महिलांचे जीवन खराब होऊ नये म्हणून अनेक घरांत आपल्या बायका, मुली, सुनांना स्वतःच मारले. या सर्व फाळणीच्या आठवणी जागवायच्या की विसरायच्या?, असा उद्विग्ण सवाल राऊतांनी मोदींना विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!