🕒 1 min read
अकोला : आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. एका कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी महाविकास आघाडी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात देखील तेथे उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यामधील पारसफाटा येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात यशोमती ठाकूर बोलत होत्या. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहून म्हणाल्या की, बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. ४५० रुपये मिळत होते. आपण काही काळापूर्वी एक हजार १२५ रुपये केलेले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की कमीतकमी दोन हजार ५०० रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. तसेच पुढे बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत. तुम्ही जर बोललात तर साथ मिळेल’.
अकोला – बाळापुर रोडवरील हॉटेल मराठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना केलेली मदत सुपुर्द केली तसेच यावेळी शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात येणाऱ्या अडचणी, भूसंपादन मोबदला आणि इतर काही प्रश्न जाणून घेतले. pic.twitter.com/mBi5ZQBRZw
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) August 21, 2021
दरम्यान, मोदी सरकारवर टीका करत त्या म्हणाल्या की ,’केंद्रातील सरकार हिंदू विरोधी सरकार आहे. तसेच शनिवारी यशोमती ठाकूर यांनी बाळापुर रोडवरील हॉटेल मराठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना केलेली मदत सुपुर्द केली तसेच यावेळी शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात येणाऱ्या अडचणी, भूसंपादन मोबदला आणि इतर काही प्रश्न जाणून घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अर्थकारणाचा विषय ; त्वरित सर्व मंदिरे उघडा’
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

