पुणे : निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे निधन झालं आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी बाणेरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती.
पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एल.एल.बी) मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे वकील म्हणून सराव सुरू केला.
1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सहा वर्ष त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. 1995 मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- … म्हणून थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडून वीजबिलांची वसूली करण्यावर महावितरण आहे ठाम
- एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- उदगीरच्या पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
