लातूर : मुळचे उदगीर येथील रहिवासी असणारे पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात आपल्या सर्व्हिस पिस्तुलातुन स्वत: वर गोळी झाडून घेत अत्महत्या केली. भूषण पवार हे वाशी येथील एपीएमसी पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. चाकूर येथील अकादमी मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले होते.
भूषण पवार हे एपीएमसी पोलिस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलिस निरिक्षक या पदावर कार्यरत होते. मागील अनेक दिवसापासून भूषण पवार हे रजेवर होते. आजच ते कामावर पुन्हा रुजू झाले होते. पोलीस ठाण्यातील डिटेक्शन रुममध्ये ते आपल्या केबीन मध्ये एकटेच बसले होते. अचानक केबीन मधून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या केबीनकडे धाव घेतली. तेव्हा भूषण पवार यांनी स्वत: वर गोळी झाडल्याचे निदर्शनास आले.
तत्काळ त्यांना वाशी एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे मुळ कारण अजून स्पष्ट झाले नाहीत. पण मागील अनेक दिवसापासून ते तणावाखाली होते अशी माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितली. त्यांच्या अत्महत्येमुळे पोलीस स्टेशन परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. सहकाऱ्यांनी त्यांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- आयपीएल लिलावापुर्वी सचिनच्या लेकाची उत्कृष्ठ कामगिरी
- एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत
- “त्याची तुलना इतरांशी करण्याऐवजी त्याच्या सामर्थ्यानुसार खेळण्याची त्याला संधी देण्यात यावी”
- वीजपुरवठा खंडितचा निर्णय मागे घ्या, आमादार संतोष दानवेंचा आंदोलनाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
