Share

एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत

Published On: 

औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे आज शहरात आहेत. या दरम्यान ते घाटी रुग्णालय येथे एमआरआय मशीन्सचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी घाटीच्या प्रंलबित मदर अॅण्ड चाइल्ड हेल्थ विंगविषयी ते काय निर्णय घेतील या कडे सर्वाचे लक्ष आहे. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती असणार आहे.

घाटीत २०१९ मध्ये १९,३२२ प्रसूती करण्यात आल्या होत्या. कोरोना काळातही अकरा हजारपेक्षा अधिक प्रसूती झाल्या. प्रसूतींची संख्या आधिक असल्यामुळे २०० खाटांचा एमसीएच विंगचा प्रस्ताव घाटीसाठी गरजेचा आहे. यासाठी घाटीतल्या एमसीएच विंगसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून जुलै २०१८ मध्ये ३८ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी मिळून केंद्राकडून पाच कोटींचा निधी आला होता. मात्र शासनदरबारी लालफीतशाहीत एमसीएच विंगचा प्रस्ताव अडकल्यामुळे कुठलाही निर्णय होत नाही.

सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री घाटी रुग्णालयाला भेट देणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून एमसीएच विंगसाठी पैसे मंजूर झाल्यानंतरही वैद्यकीय शिक्षण विभागाकडून केवळ प्रशासकीय मान्यता मिळत नाही. त्यामुळे आता अमित देशमुख काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सोमवारी घाटीतील तीन टेस्ला एमआरआय मशीन्सचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी घाटी रुग्णालय येथील कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला आहे. सकाळी पावणेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!