🕒 1 min read
नवी दिल्ली: जवळ जवळ तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले होत.
यामध्ये डॉक्यूमेंटचे टायटल ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक-फर्स्ट वेव्ह’ असे आहे. भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा, तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. २६ जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात, राज्यात, देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि सहभागी व्हा. यासह स्वतः एखादे आयोजन करा, असे या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले होते.
दरम्यान, या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने बेंगळुरुतील 21 वर्षीय क्लायमेट अ;ॅक्टिव्हिस्ट दिशा रविला अटक केली आहे. या प्रकरणातील भारतातील ही पहिली अटक आहे. दिशा रवि ही फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनची संस्थापक सदस्य आहे. 4 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी टूलकिट संदर्भात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. टूल किट प्रकरणातील ही पहिली अटक आहे. दिशाने माउंट कार्मेल कॉलेजमधून बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशनची पदवी संपादन केली आहे. दिशा सध्या गुड माइल्ड कंपनीशी संबंधित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा तिला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली तेव्हा ती घरून काम करत होती.
यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिशा अटकेचा विरोध केला आहे. यावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘भारत मूर्खपणाची रंगभूमी बनत चालला आहे’ अशा शब्दांत निशाणा साधला आहे.
भारत बेतुका रंगमंच बन रहा है और यह दुखद है कि दिल्ली पुलिस उत्पीड़कों का औजार बन गई है।
मैं दिशा रवि की गिरफ्तारी की कड़ी निंदा करता हूं और सभी छात्रों और युवाओं से आग्रह करता हूं कि वे निरंकुश शासन के खिलाफ आवाज उठाएं।— P. Chidambaram (@PChidambaram_IN) February 14, 2021
पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला असल्याची घणाघाती टीका देखील चिदंबरम यांनी केली आहे. ‘जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचं एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झालं आहे’ असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
‘भारत एक मूर्खपणाची रंगभूमी बनत आहे आणि दिल्ली पोलीस अत्याचाऱ्यांचे साधन बनले आहेत, ही खेदाची बाब आहे. मी दिशा रवीच्या अटकेचा तीव्र निषेध करतो आणि सर्व विद्यार्थी आणि तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करतो’ असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिेले आहे. बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात दिशा वास्तव्याला असून, याच भागातून पोलिसांनी तिला अटक केली आहे. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर; आजपासून नामनिर्देशन स्विकारणार, २१ मार्चला मतदान
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- वीजपुरवठा खंडितचा निर्णय मागे घ्या, आमादार संतोष दानवेंचा आंदोलनाचा इशारा
- नाकावर बेशुध्दीचे पावडर टाकून महिलेचे दागिने लुटले; अंबड नगरपरिषदेसमोरील प्रकार
- परभणीच्या वाघी परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
