मुंबई : मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी संताप व्यक्त केला आहे. २५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार होती. ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली गेली आहे. ‘सुनावणी का पुढे ढकलली गेली? महाविकास आघाडी सरकार गोट्या खेळतंय का?’ असा संतप्त सवाल विनायक मेटे यांनी केला आहे.
‘मराठा आरक्षणावरून सरकार वेळकाढूपणा करत आहे. सरकारचा हा वेळकाढूपणा आम्ही खपवून घेणार नाही,’ असे देखील ते म्हणाले. ‘मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि मंत्री वर्षा गायकवाड यांच्या जिल्ह्यात, मतदारसंघात जाऊन या मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात राजेश टोपे यांच्या जालन्यातून करण्यात येणार’ असल्याचं मेटे यांनी सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी मेटे यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकरभरती पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तसेच कोर्टात अर्ज सादर करणाऱ्या एमपीएससीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ‘एमपीएससीचा भरती विरोधातील अर्ज ही जातीयवादी भूमिकाच आहे. मराठा समाजात सरकारच्या धोरणांवर असंतोष आहे,’ असंही त्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी लावलेले अनधिकृत फलक काढले म्हणून पोलिसांचा दुखावला इगो !
- मतदार संघातून कायम गायब असणाऱ्या खासदार लोखंडेंनी कोरोना काळात मतदार संघात एक ढबुही आणला नाही !
- अर्नब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई करा, उद्या कॉंग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
- …तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; वीजबिलावरून दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
- सिरममधील आगीमागे नेमकं कारण काय ? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

