Share

मतदार संघातून कायम गायब असणाऱ्या खासदार लोखंडेंनी कोरोना काळात मतदार संघात एक ढबुही आणला नाही !

Published On: 

अहमदनगर : अवघ्या जगावर गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं सावट आलं आहे. या रोगावर लस बनवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी आटापिटा केला. सुमारे ८ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर जगभरात शास्त्रज्ञांना यश आलं. देशातील सिरम इन्स्टिट्यूटने पहिली लसीचा मान मिळवल्यानंतर या कंपनीचे जगभरात कौतुक केले गेले.

कोरोना काळात राज्यातील जनतेचे जीव कसे वाचवायचे या विवंचनेत असलेल्या राज्य सरकारने अशाही स्थितीत राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून आपापल्या मतदारसंघातील आरोग्यसेवा ठिकठाक करुन या महामारीशी थेट मुकाबला करणाऱ्या  आरोग्य सेवकांना आवश्यक सामग्रीचा पुरवठा केला जाणे अपेक्षित होते. मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.

शिर्डीचे खासदार व शिवसेना नेते सदाशिव लोखंडे यांनी कोणताच निधी आपल्या मतदार संघासाठी आणलाही नाही आणि खर्चही केला नाही. खरेतर कोविडच्या काळात नेहमीप्रमाणे खासदार लोखंडे हरवले होते. असे असतांनाही केंद्र सरकारच्या ‘गव्हर्न आय’ यंत्रणेद्वारा झालेल्या सर्वेक्षणात कोविडच्या काळात आपल्या मतदार संघात भरीव काम करणाऱ्या देशातील 25 खासदारांमध्ये त्यांचा समावेश झाला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!