Share

गिरीश महाजनांच्या चुकारपणामुळे नांदगावचे ग्रामस्थ नाराज

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थितीचे निवारण करण्यसाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या उपाययोजना प्रत्यक्षरीत्या राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दुष्काळी दौर्यावर पाठवले आहे. मात्र या मंत्र्यांच्या दौऱ्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे दिसत आहे.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सोमवारी आपल्या जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव येथे दुष्काळी दौरा आयोजित केला होता. मात्र दौरा पूर्ण करताना नांदगाव तालुक्यात येण्यास महाजन यांना रात्री उशिर झाला. त्यामुळे महाजन यांनी दौरा अर्धवट सोडून नाशिककडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र नांदगाव येथे पालकमंत्र्यांची वाट पाहात बसलेल्या हिसवळ येथील ग्रामस्थांचा महाजनांच्या  या चुकारपणामुळे हिरमोड झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

राज्यात यंदा भीषण दुष्काळ पडला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जनावर देखील चाऱ्या – पाण्याविना मृत्युला सामोरे जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कडून दौऱ्यांच्यामार्फत दुष्काळी उपाययोजनांना गती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!