बीड: जिल्ह्यातील माजलगाव येथील मोगरा या गावात गावकऱ्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या गावात महावितरणने थकीत बाकीच्या नावाखाली सार्वजनिक बोअरची वीज कट केली आहे. महावितरणाच्या वसुलीसाठी गावातील सार्वजनिक बोरचेही कनेक्शन कट केले आहे. या विरोधात गावकऱ्यांनी भर उन्हात आंदोलन केले आहे. येथील गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्याकडे गोदावरीतील प्रस्तावित जलसमाधीला परवानगी द्यावी, अशी मागणी तहसीलदारांमार्फत केली आहे.
आधीच कोरोनाचे संकट त्यात गारपीट तसेच दुषित पाण्याच्या समस्येने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यात भर म्हणजे महावितरणने सार्वजनिक बोअरचे वीज कनेक्शन कट केले आहे. गावात पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे गावात नळ नाही, एक हातपंप आहे पण त्याला पाणी नाही, पाणी आलं तरी दुषित पाणी येत असल्याची तक्रार येथील गावकऱ्यांनी केली आहे. जुने हातपंप नादुरुस्त असल्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी १७ किमी दूर असलेल्या माजलगावला जावे लागत आहे.
गावात तीन दिवसांपूर्वी गावातील महिलांनी रणरणत्या उन्हात ग्रामपंचायत समोर आंदोलन केले. ग्रामसेवक बजरंग राठोड यांनी लेखी आश्वासन देऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत बोअर सुरू करतो असे सांगितले. आंदोलन होऊन पाच दिवस झाले तरीही ग्रामसेवक गावात आलेला नाही. गावातील लाईनमनचे वागणे संशयास्पद असून काही ठिकाणी आकड्यावरच वीज सुरू असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. ग्रामपंचायतने पाणी द्यावे अन्यथा प्रशासनाने गोदावरीत जलसमाधीस परवानगी द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या आधी चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का ; वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून माघार
- ठाणे जिल्हा बँकेत महाविकासआघाडीचा दारुण पराभव, बविआ-भाजपचे निर्विवाद वर्चस्व
- हम नहीं सुधरेंगे! महावितरणचा भोंगळ कारभार, वीज कनेक्शन तोडूनही आले शंभर युनिटचे बिल
- छोट्या बचत योजनांचे व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे; सर्वसामान्यांना दिलासा
- सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

