नवी दिल्ली : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला. यांनी याबाबत घोषणा केली.
प्रकाश जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘आम्हाला आनंद आहे की देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना वेळोवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. आजचा महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.
रजनीकांत गेल्या पाच दशकांपासून सिनेमा विश्वात राज्य करीत आहेत. आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत. यामुळेच दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्याचे निर्णायक मंडळाने निश्चित केले आहे. निर्णायक मंडळामध्ये आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई यांच्या एक मतावर रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कर देण्याचे जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय महिला संघात कोरोनाचा शिरकाव; हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण
- बॉलिवूडवर कोरोनाचं सावट ; प्रसिद्ध संगीतकार ‘बप्पी लहरी’ कोरोना पॉजिटीव्ह
- आयपीएल आधी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के
- ‘कोरोना आम्हाला स्पर्शही करणार नाही’ या फाजील आत्मविश्वासातून कोरोना वाढत गेला’
- बीड जिल्हा; पीपीई कीट घालून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप कोरोना रुग्णांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

