Share

ठाणे जिल्हा बँकेत महाविकासआघाडीचा दारुण पराभव, बविआ-भाजपचे निर्विवाद वर्चस्व

Published On: 

ठाणे – सहकार पॅनेलनं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत बाजी मारली आहे. सहकार पॅनेलनं 21 पैकी 18 जागा जिंकल्या असून मतदारांनी महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर व भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे हा विजय मिळाला असल्याचे जाणकार सांगत आहेत.

परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यादोन्ही मंत्र्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करूनही बँकेच्या मतदारांनी त्यांना नाकारले. सहकार पॅनलच्या गेल्या टर्ममधील कार्याला मिळालेली ही पोचपावती असून सहकार पॅनलमध्ये अनुभवी संचालक असून पुढील काळात बँक अधिक नावारुपाला नेण्याचे काम हे संचालक करतील, असा विश्वास भाजपने व्यक्त केला.

प्रथमच एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलने आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. खूप गाजावाजा करीत परिवर्तन पॅनलने प्रचारात मुसंडी मारत ही निवडणूक चुरशीची होत असल्याचे चित्र निर्माण केले होते मात्र हा फुगा मतदारांनी फोडत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना नाकारले.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे खा . कपिल पाटील व आ. किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल ने २१ पैकी १८ जागा जिंकल्या आहेत. या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खा. कपिल पाटील व आ . किसान कथोरे यांचे अभिनंदन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!