मुंबई : राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री दिली आहे.
दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आरोग्य विभागाच्या परीक्षा राज्य सरकारने परीक्षेला काही तास शिल्लक असताना रद्द केल्या, हे अतिशय बेजबाबदार पणाचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पोरखेळ या सरकारने करून ठेवला आहे.आरोग्य मंत्र्यांच्या एका साध्या मीडिया बाईटच्या माध्यमातून फक्त दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपणार नाही.
ते म्हणाले, गोरगरीब विद्यार्थी कोणाकडून उसने पैसे घेऊन, काही तरी व्यवस्था लावून परीक्षा केंद्र ठिकाणी पोहोचले आहेत. त्यांची नुकसान भरपाई कोण देणार? त्यांच्या परीक्षांची तारीख सरकारने पुढच्या चार दिवसांत जाहीर करावी! आणि अशा बेजबाबदार मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा,विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही करीत आहोत. या गोष्टीचा निषेध म्हणून राज्यभर भारतीय जनता युवा मोर्चा आंदोलन करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार, 56 विमानांच्या खरेदी करण्याकरिता स्पेनच्या कंपनीसोबत करार
- मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबद्दल मोठे अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

