🕒 1 min read
नवी दिल्ली – भारतीय हवाई दलासाठी सी- 295 एम डब्ल्यू या प्रकाराची 56 वाहतूक विमानं खरेदी करण्याकरिता भारतानं स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेस या कंपनीबरोबर करार केला आहे. या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळानं या महिन्याच्या सुरुवातीलाच मंजुरी दिली होती.
सी- 295 एम डब्ल्यू विमानांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. ही विमानं हवाई दलाच्या जुन्या अॅव्हरो विमानांच्या ताफ्याची जागा घेतील. या विमानांमुळं हवाई दलाच्या वाहतूक क्षमतेत मोठी वाढ होणार असून विशेषतः ईशान्य भारत आणि अंदमान निकोबार बेटांच्या क्षेत्रात त्यांचा फायदा होणार आहे.
हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत अभियानालाही बळ देणारा आहे. कारण याद्वारे भारतातल्या खासगी क्षेत्राला स्पर्धात्मक हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. भारताला मिळणाऱ्या 56 विमानांपैकी 40 विमानांचं उत्पादन भारतात टाटा कंपनीतर्फे केलं जाणार आहे. या खरेदीमुळं आधुनिकीकरणाच्या दिशेनं जाणाऱ्या हवाई दलाला मोठं बळ मिळालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ
- ब्रेकिंग : अखेर मंदिरांची दारे उघडणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केली तारखेची घोषणा
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबद्दल मोठे अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
