Share

गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचे समोर आले आहे. सरकारच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थी अतिशाय संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या सर्व प्रकरणी आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी टोपे यांच्यावर तोफ डागली आहे. ते म्हणाले, ऐनवेळी परीक्षा रद्द करून मानसिक खच्चीकरण केलं जात आहे, महिन्यापासून तारीख दिली असताना शेवटच्या दिवशी रात्री १० ला कळवले परीक्षा रद्द. ६३० रू gst सह फी भरली विद्यार्थ्यांनी, लूट चालू केली आहे या सरकारने. गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय. याची भरपाई कशी होणार व कोण देणार? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!