मुंबई :देशात सातत्याने लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीची गळचेपी होते आहे असा सूर विरोधकांकडून सतत लावलेला असतो. सरकारवर टीका करताना नेहमी वापरल्या जाणाऱ्या या मुद्द्यांवर जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रोकठोक प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीची गळचेपी होते आहे असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे असं गोखले यांनी म्हटलं आहे.
गोखले यांनी विले पार्ले या ठिकाणी काल मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होण्याची गरज आहे .मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी एंजॉय करणारे आणि मतदानाकडे पाठ फिरवणारे लोक या देशाचे क्रमांक एकचे शत्रू आहेत असंही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले गोखले ?
देशात सातत्याने लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीची गळचेपी होते आहे कोण असं म्हणतं त्यांना समोर आणा! मी आत्ता माझं मत मांडतो आहे, इथे प्रत्येकजण मत मांडू शकतो, यांना मतदान करा किंवा करू नका हे सांगू शकतो अशावेळी गळचेपी होते आहे अशी ओरड करणारी माणसं आहेत कोण? त्यांना माझ्यासमोर आणा. लोकशाहीची गळचेपी होते असं म्हणणाऱ्यांना थोबडवून काढलं पाहिजे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
