गडचिरोली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काल(१८ नोव्हें.)गडचिरोलीत होते. यावेळी बोलत असतांना राज्यातील मोठ्या शहरांमध्ये शहरी नक्षलवाद वेगाने पसरत आहे. त्यामुळे सरकारने शहरी नक्षलवाद्यांवर त्वरीत कारवाई करावी, अशी सूचना पवारांनी केली. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधत टीका केली आहे.
यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून त्यात ते म्हणाले आहेत की,’एका बाजूला एल्गार परिषदेची पाठराखण करायची आणि दुसऱ्या बाजूला शहरी नक्षलवादावर कारवाई करायच्या सूचना करायच्या. शरद पवारांनी हा दुतोंडीपणा बंद करावा’, असे ते म्हणाले आहेत.
एका बाजूला एल्गार परिषदेची पाठराखण करायची आणि दुसऱ्या बाजूला शहरी नक्षलवादावर कारवाई करायच्या सूचना करायच्या. शरद पवारांनी हा दुतोंडीपणा बंद करावा. pic.twitter.com/VwCLloBpPp
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 19, 2021
दरम्यान, नक्षलवाद विरोधी कारवाईत पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अजूनही शहरी नक्षलवाद आहे. नागपूर ते पुण्यापर्यंत शहरी नक्षलवाद पसरत आहे. त्यामुळे आताच काळजी घेणं गरजेचं आहे. या प्रकारावर त्वरीत कारवाई केली नाही तर समस्या निर्माण होऊ शकते, असे पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ मध्येच फुटला’, फडणवीसांचे टीकास्त्र
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
- ‘भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- ‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
- लड़ने को तुम और भाषण को हम- संजय राऊत


