Share

 ‘…म्हणून तुम्ही रोहित शर्मा, विराट कोहली किंवा केएल राहुलला बाहेर काढू शकत नाही’

Published On: 

जयपूर : टी-20 विश्वचषकातील भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर काही क्रिकेट तज्ज्ञांनी विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलवर निशाणा साधला आहे. या खेळाडूंकडून अपेक्षा असतानाही हे खेळाडू उत्तम कामगिरी करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. तसेच हे तिघे एकत्र खेळू शकत नाही, तरूणांना संघात आणले पाहिजे. अशी चर्चा देखील सर्वत्र चालू आहे.

मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याला सहमत नाही. त्याचा असा विश्वास आहे की भारताकडे नक्कीच काही महान युवा खेळाडू आहेत परंतु आपण या तीन खेळाडूंना येणाऱ्या काळात लवकर बाहेर टाकू शकत नाही.

विश्वचषक विजेत्या पाँटिंगने ग्रेड क्रिकेटरशी संवाद साधताना याविषयी टिप्पणी केली आहे. ‘सध्याच्या खेळाडूंना मागे टाकता येईल का हे पाहण्यासाठी भारताने ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यासारख्या काही तरुण आयपीएल स्टार्सना मुख्य संघात आणण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे का, असा प्रश्न त्याला यावेळी विचारण्यात आला होता.’

या प्रश्नावर बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला की, ‘भारत काही तरुण खेळाडूंचा संघात समावेश करण्याचा प्रयत्न करू शकतो पण महत्त्वाचे खेळाडू संघाचे आधारस्तंभ म्हणून उपस्थित संघात असतील. पाँटिंग म्हणाला, ‘भारतीय संघात तरुण खेळाडू इशान किशन आणि सूर्यकुमार यादव होते, श्रेयश अय्यरही प्रवासी राखीव म्हणून सोबत होता. पण तुम्ही रोहित शर्मा, विराट किंवा केएल राहुलला यांसाख्या बड्या खेळाडूंना बाहेर टाकणार नाही.

भारतीय संघात हार्दिक पांड्या सारखा खेळाडू आहे पण जर तो गोलंदाजी करत नसेल तर मधल्या फळीतील तरुण खेळाडूंपैकी एकाचा वापर करू शकतो, पण हो, बरेच पर्याय आहेत. इतके चांगले तरुण खेळाडू की जेव्हा एखादा वरिष्ठ खेळाडू चांगली कामगिरी करत नाही तेव्हा तुम्हाला वाटते ‘या युवा खेळाडूंना समाविष्ट करू’ पण, तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत, त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात.

दरम्यान,की पाँटिंगनेही भारताच्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्यासाठी व्यस्त वेळापत्रकाला जबाबदार धरले. त्यांच्या मते, प्रवासामुळे आणि बराच वेळ बायो बबलमध्ये राहिल्याने खेळाडू थकले होते आणि त्यामुळे संघाची कामगिरी चांगली झाली नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!