Share

शरद पवारांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचं सडेतोड उत्तर

Published On: 

मुंबई : आदिवासींच्या मुद्द्य्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ‘आज देशाची सूत्रे भाजपाकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण मला आश्चर्य वाटलं, तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द वापरण्यात आला. वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही,’ असं शरद पवार म्हणाले होते यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

याआधी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘आदिवासींचं दुःख, त्यांच्या यातना, मुलांचे शिक्षण, आदिवासींचं आरोग्य त्या लोकांसाठी काहीच महत्वाच नव्हतं. भारताच्या सांस्कृतिक यात्रेत जनजातीय समाजाचं योगदान अतूट राहीलं आहे. जनजातीय समाजाच्या योगदानाशिवाय प्रभू रामाच्या जीवनात यशाची कल्पना केली जाऊ शकते का? कधीच नाही,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. हा व्हिडिओ देखील देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत. आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात, अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत!’, असे ते ट्विट करत म्हणाले आहेत. यासोबतच त्यांनी शरद पवारांचे ट्विट रिट्विट केले आहे.

 

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!