🕒 1 min read
नवी दिल्ली : पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या आफ्रिदीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात १०० विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. शाहीन आफ्रिदीने जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड मोडीत करून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे. बुमराहनं यापूर्वी २३ वर्ष व ५७ दिवसांचा असताना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. आफ्रिदीनं २० वर्ष व ३२६ दिवसांचा असताना ट्वेंटी-20त १०० विकेट्स घेतल्या.
आफ्रिदीनं पाकिस्तान सुपर लीगच्या सातव्या सामन्यात ही पराक्रम केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात १०० विकेट्सचा विक्रम तसा अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमान याच्या नावावर आहे. त्यानं १८ वर्ष व २७१ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. पण, आफ्रिदी हा सर्वात सर्वात युवा जलदगती गोलंदाज ठरला.
Shaheen Afridi (20 years) is the youngest Fast Bowler in T20 history to take 100 wickets. Great achievement. #LQvMS #PSL2021
— Mazher Arshad (@MazherArshad) February 26, 2021
पाकिस्तान सुपर लीगमध्ये आफ्रिदी मुल्तान सुल्तान्सनं लाहोर कलंदर्स संघाला ७ विकेट्सनं पराभूत केलं. मुल्ताननं मोहम्मद रिझवानच्या ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर हा विजय मिळवला. रिझवाननं ४९ चेंडूंत १२ चौकार लगावले. कलंदर्सनं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५७ धावा केल्या. या सामन्यात आफ्रिदीनं दोन विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- दीड वर्षानंतर अंगारकी चतुर्थीचा योग; मात्र, राजुरेश्वराचे मंदिर राहणार बंद
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
- मिळालेला निधी खर्च करण्यासाठी लगीनघाई; पण तांत्रिक अडचणीमुळे रखडली कामे
- ‘तुम्ही नोकरी कसे करता तेच पाहतो’ म्हणून पोलिसांवर चाकुहल्ला; छावणीतील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
