अहमदनगर : ‘राज्याचे ग्रामविकास मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वत:ची बॅलन्सशीट तपासण्यात व्यस्त असल्याने नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत नाहीत,’ अशी टीका नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली होती. त्यांना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज उत्तर दिले.
‘विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या बॅलन्सशीटमध्ये डोकावण्याची खुमखुमी आली आहे. कोणाची बॅलन्सशीट तपासायची असेल तर ते काम आम्हालाही येते,’ असा इशाराच तनपुरे यांनी दिला.
प्राजक्त तनपुरे यांनी आज नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी खासदार विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नगरमध्ये उपोषण करण्यात आले होते. त्यामध्ये विविध विषयांवरून विखे यांनी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका केली होती. त्याला आज तनपुरे यांनी उत्तर दिले. तसेच भाजपच्या उपोषणाची खिल्लीही उडविली.
‘पालकमंत्री मुश्रीफ हे वैद्यकीय कारणामुळे जिल्ह्यात येऊ शकले नाहीत. ते वयाने आणि अनुभावाने ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत, याचे तरी भान टीका करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते. आपली बॅलन्सशीट तपासली जाईल, या भीतीने आधीच काही लोक भाजपमध्ये गेले. हर्षवर्धन पाटील यांनी याची कबुली देताना आपल्याला भाजपमध्ये आल्यापासून निवांत झोप लागते, असे नुकतेच म्हटले आहे. विखेही अशा निवांत झोप येणाऱ्या पक्षात गेलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या बॅलन्सशीटमध्ये डोकावण्याची खुमखुमी त्यांना येत असावी’, असंही प्राजक्त तनपुरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- तालुक्यात विकासकामं केल्यावर मला शांत झोप लागते; दत्तामामांचा हर्षवर्धन पाटलांना सणसणीत टोला
- बाबांनो…तरीही पवारसाहेबांना पण विचारावं लागणार आहे; अजित पवारांचा यु टर्न
- उद्धव ठाकरेंचा दसऱ्यादिवशीच शिमगा, शेतकऱ्यांविषयी एकही शब्द काढला नाही- चंद्रकांत पाटील
- ‘उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यात गुंतवणूक असेल तर त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल’
- ‘घराबाहेर पडून ते शेताच्या बांधावर गेले असते तर शेतकरी कसा उद्धवस्त झाला आहे याची जाणीव झाली असती’
- ‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी’ : संदीप देशपांडे


