🕒 1 min read
मुंबई : काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्याभाषणा संदर्भात अनेक राजकीय व्यक्ती यांनी आपले मत जाहीरपणे मांडले त्यातलेच एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी काल विजयादशमी निमित झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, ‘आम्ही लहान असतांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जात होतो तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी जायचो ती खरोखरच एक पर्वणी होती त्यातून एक नवी दिशा, नवा मार्ग, नवी उर्जा मिळायची. परंतु कालचे उद्धव ठाकरेंचे भाषण मीठ नसलेल्या जेवणासारखं होत आणि ते लोकांना सुद्धा आता वाटू लागले आहे.’ अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली.
दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी. गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 16, 2021
तर पुढे ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री यांनी केलेल्या हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदूंपासुन या वक्तव्यावर देशपांडे यांनी पलटवार केला आहे ते म्हणाले की मला ते हिंदू , नवहिंदू कळत नाही पण ही नवीन शिवसेना आहे अस मला वाटतं आणि ही नवीन शिवसेना आहे त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ठरलं तर मगं…राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच!
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
