🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला.
यानंतर १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे काही नेत्यांना लक्ष्य केलं आहे. तसेच त्यांना इशारा देखील दिला आहे. त्यांना पक्षांतर्गतच काही नेते विरोध करत असल्याचे बोलले जाते. याबाबत मुंडेंनी याआधी देखील भाष्य केलं होतं. आता पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा राजकीय विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
यावर आता काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. ‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचं त्यांनीच ठरवावं. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ,’ असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना टोला लागावला आहे.
पंकजा मुंडे अन् महाभारत –
‘जगात देशाची मान उंचावणाऱ्या पंतप्रधानांनी माझा कधीच अपमान केला नाही. राष्ट्रीय नेत्यांकडूनही नेहमीच सन्मान मिळाला. पांडवांनी धर्म युद्ध जिंकलं. कौरव मोठ्या संख्येने होते. पांडव जिंकले कारण त्यांच्याकडे धर्म होता, नीती होती, सारथी कृष्ण होता, सत्ता करण्याची क्षमता होती. त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांनी केवळ पाच गावं मागितली होती. सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीनही देण्यास कौरवांनी नकार दिला.’
‘धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. लोक धारातिर्थी पडू नये, लोकांचा जीव जाऊ नये यासाठी असा विचार त्यावेळचे योद्धे करायचे. आम्ही नव्या काळातील योद्धे आहोत. मी धर्मयुद्ध टाळण्याचा तोपर्यंत प्रयत्न करते जोपर्यंत शक्य आहे,’ असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, ‘कौरवांसोबत जेवढे लोक होते ते मनानी पांडवांसोबत होते आणि शरीरानी कौरवांसोबत. कौरवांचे सारथी देखील त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे काळ कोणासोबत थांबत नाही. मी दु:खी नाही. तुमचं दु:ख माझ्या ओटीत टाका. माझं हसू तुम्ही घ्या. आपण खूप संघर्ष पेलले आहेत. माझं समर्पन लोकांप्रती आहे. धर्मयुद्ध टाळण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. मला खूप काळजीने निर्णय घ्यावे लागतात.
‘आपण केंद्रीय नेतृत्वार विश्वास ठेवुयात. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. स्वाभिमान हा गोपीनाथ मुंडे यांचा बाणा होता आणि तो जपायचाय,’ अशी भावनिक साद देखील पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना घातली आहे. दरम्यान, मुंडेंनी उल्लेख केलेले कौरव कोण यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला संपवण्याचा प्रयत्न झाला असला तरीही मी संपले नाही’- पंकजा मुंडे
- हाताच्या पंजाने ‘वाघ’ पुन्हा गारद; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘पांडवांकडे सत्तेची क्षमता होती, मात्र…’; पंकजा मुंडेंच्या महाभारतातील कौरव नेमके कोण ?
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

