नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांना देशातील पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांसबंधी प्रश्न विचारले असता, यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की पाचही राज्यांमध्ये भाजपची लाट आहे. तसेच या मुलाखतीत त्यांनी भाजपच्या कामांचा पाढाच वाचून काढल्याचे दिसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या त्या विधानावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी टीका केली आहे. विजय वडेट्टीवार नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपची लाट आहे की नाही हे जनता ठरवेल, येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय कोणाची लाट आहे हे तेव्हाच कळेल. आता लाट जर म्हणली तर उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा असंतोष दिसलाच नसता, असं वडेट्टीवार म्हणाले.
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, लोकांची असंतोषातून जर लाट आहे तर ती असंतोषाची लाट आहे, लोकांच्या आक्रोशची लाट आहे. लोकांच्या बेरोजगारीची लाट आहे, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीच्या विरोधातली लाट आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आमच्याकडून ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे, असंही म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “राऊत साहेब महाराष्ट्राची मान तेव्हाच खाली गेली जेव्हा..”, केशव उपाध्येंचा टोला
- कर्नाटक हिजाब प्रकरणी भाजप खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, शाळेबाहेर तुम्हाला…
- मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहीत मंगेशकर कुटुंबियांनी व्यक्त केली नाराजी
- जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात दाखल
- “घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी…”, हृदयनाथ मंगेशकरांसंबंधी मोदींनी केलेल्या ‘त्या’ दाव्यावर राऊतांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

