Share

कर्नाटक हिजाब प्रकरणी भाजप खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, शाळेबाहेर तुम्हाला…

Published On: 

मुंबई: कर्नाटकच्या उडपीमध्ये हिजाब प्रकरणाच्या वादाची सुरुवात झाली. उडपीमधील एका शाळेत मुलींनी हिजाब घातला म्हणून त्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप काही विद्यार्थीनींनी केला होता. या नंतर शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणावरून आता राजकारण देखील तापत आहे.

या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तीन दिवस राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सध्या कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाची वाट पाहात आहोत, मी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, त्यांनी विनाकारण वाद घालू नये, शांतत ठेवावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.

या प्रकरणी आता भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हेमा मालिनी म्हणाल्या, शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा, असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!