🕒 1 min read
पुणे: ज्येष्ठ अभिनेते तथा दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावल्याने (Veteran actor Amol Palekar health deteriorated) त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाख करण्यात आले आहे. त्यांच्यावर एका दीर्घ आजारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे.
दरम्यान १० वर्षांपूर्वी अतिधुम्रपान केल्यामुळे त्यांना त्रास होत होता. याच त्रासामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्या विनोदी भूमिकेमुळे त्यांनी सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले.
अमल पालेकर यांनी मराठीतील शांतता कोर्ट चालू आहे या सिनेमाद्वारे सिनेक्षेत्रात पर्दापण केले. गोलमाल सिनेमातील त्यांचा डबलरोल त्याकाळी प्रचंड गाजला. तसेच चितचोर, रंगी-बेरंगी, बातों बातों मे हे सिनेमा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी अभिनित पहेली सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या:
- UP Assembly Election 2022 : “देशाला भयापासून मुक्त करा”, राहुल गांधींचे ट्वीट चर्चेत
- VIDEO: “पळत का नाहीस रे” कर्णधार रोहितने खेळाडूला मैदानावर झापले
- ‘कोणते कपडे घालायचे ते ‘हेच’ ठरवणार?’; सुप्रिया सुळेंचा संसदेत सवाल
- “…हेच का तुमचं महाराष्ट्र प्रेम, महाराष्ट्र बाणा”, राऊतांनी भाजप नेत्यांना सुनावले
- “राऊत साहेब महाराष्ट्राची मान तेव्हाच खाली गेली जेव्हा..”, केशव उपाध्येंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
