Share

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहीत मंगेशकर कुटुंबियांनी व्यक्त केली नाराजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज कायमचाच हरपला असून ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या स्वरांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचं मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान, मंगेशकर कुटुंबीयांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर(Suhas Pednekar) यांच्या कारभारावर आता तीव्र आक्षेप घेतला असून यासंदर्भात त्यांनी पेडणेकरांना पत्र पाठवले आहे.

पत्रात म्हंटले आहेत की,‘मुंबई विद्यापीठाने स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे ९ फेब्रुवारीच्या वृत्तपत्रांमधील बातमीद्वारे समजते. परंतू, आपणांस ज्ञात आहेच की, यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर व त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार “मास्टर दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय’ स्थापन करण्याकरिता मंगेशकर कुंटुंबातील सदस्य तसेच संगीत क्षेत्रातील इतर मान्यवरांची समिती स्थापन केली होती. सदर समितीने मुंबई विद्यापीठातील जागेची पाहणी करुन सदरची जागा शासकीय आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी देणेबाबत सुचविले. परंतू मुंबई विद्यापीठाने सदरची जागा महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन न दिल्यामुळे मंगेशकर कुटुंबियांचे स्वप्न लता दिदींच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही, याबाबत खेद वाटतो.’

दरम्यान, आता दिदींचे निधन झाल्यामुळे सदर शासकीय महाविद्यालय “भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय” या नावाने स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना मंगेशकर कुटुंबियांनी विनंती केली आहे. त्याअनुषंगाने तसा निर्णय राज्य शासन लवकरच जाहीर करेल. तरी, उपरोक्त वृत्तपत्रातील बातमी मधील नमूद मुंबई विद्यापीठाचे लता मंगेशकर यांच्या नावाने स्थापन करण्यात येणारे अध्यासन केंद्र हे मंगेशकर कुटुंबियांना विश्वासात न घेता स्थापन करीत असल्यामुळे ते आम्हा मंगेशकर कुटुंबियांना मान्य नाही. तरी, यापुढे मंगेशकर कुटुंबियांच्या ते परवानगीशिवाय स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे कोणताही उपक्रम मुंबई विद्यापीठाने परस्पर हाती घेऊ नये, असे पत्रात म्हणण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!