मुंबई : सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट म्हणजेच ओमिक्रॉन विषाणूची लागण झालेले 3 रुग्ण भारतात सापडले आहेत. अन्य काही रुग्णांना ओमिक्रॉन झाला असल्याची शंका आहे. परदेशातून आलेल्या नागरीकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यानंतर त्याचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. ओमिक्रॉन विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे मात्र घाबरुन जाण्याचे कारण नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
कोरोना काळात सर्वच जगाला याचा मोठा फटका बसला आहे. शाळा गेल्या 2 वर्षांपासून बंद आहेत. ऑनलाईन वर्ग सुरु होते. मात्र यामध्ये मुलांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात आता ओमिक्रॉनचा एकही रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळला नाही त्यामुळे लॉकडाऊनचा अद्याप विचार नाही. पण काळजी घेणे गरजेचे आहे. आणि कडक निर्बंध केले जातील, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉनची धास्ती वाढत असली तरीही राज्यातील शाळा बंद करण्याचा अद्याप कोणताही विचार नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
शाळा बंद करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. शाळा सुरु झाल्या आहेत. किलबिलाट आत्ता कुठे सुरु झाला आहे. 2 वर्षाने ही पिढी मागे गेली आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण पूर्ण करणे शक्यच नाही. आता पुन्हा बंद करणं अशक्य आहे. आम्ही काही गोष्टींवर निर्बंध घालणार आहोत. काही गोष्टी अनिवार्य कराव्याच लागतील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- त्यांच्या रडगाण्याशी आम्हाला घेणे देणे नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला
- मुलगी आराध्याला ट्रोल करणाऱ्यांवर अभिषेक बच्चन का भडकला ; जाणून घ्या कारण
- अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे; फडणवीसांचे शिवसेनेवर ताशेरे
- तिसऱ्या लाटेबद्दल आरोग्यमंत्र्यांच मोठं विधान; म्हणाले, तिसरी लाट…
- याहू वर सर्वाधिक शोधले गेले, आर्यन खान-सिद्धार्थ शुक्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

