Share

याहू वर सर्वाधिक शोधले गेले, आर्यन खान-सिद्धार्थ शुक्ला

Published On: 

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही याहू (Yahoo) ने सर्वाधिक सर्च केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. यात २०२१ या संपूर्ण वर्षात इंटरनेटवर कोणत्या व्यक्तींना सर्वाधिक सर्च करण्यात आले याची यादी जाहीर केली आहे. सर्वाधिक सर्च केलेले सेलिब्रिटी या यादीत यंदा अनेक नवनवीन नावे पाहायला मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/CSjmJr0IHFu/?utm_source=ig_web_copy_link

यंदा याहू (Yahoo) ने जाहीर केलेल्या यादीत टॉपवर सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla ) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या नावाचा समावेश आहे. तर यंदा या यादीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही (Aryan Khan ) समावेश झाला आहे.टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले. अनेकांनी त्याच्या खासगी आयुष्यासह इतर गोष्टी या इंटरनेटवर सर्च केल्या आहेत. हा पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CSl5H1Tqrun/?utm_source=ig_web_copy_link

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलमान खान आहे. त्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन, तर चौथ्या क्रमांकावर कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार याचा समावेश आहे. तसेच पाचव्या क्रमांकावर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा समावेश आहे. पुनीत राजकुमार आणि दिलीप कुमार या दोघांचेही निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग त्यांच्याबद्दलची माहिती, तसेच काही जुन्या आठवणींसाठी या दोघांना सर्च करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा या यादीत एका नवीन अभिनेत्याचाही समावेश झाला आहे. अभिनेता शाहरुख खानचा ( Shah Rukh Khan’s son Aryan Khan) मुलगा आर्यन खान याचे नाव या यादीत ७ व्या क्रमांकावर आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यन खान हा चांगलाच चर्चेत आला होता.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!