🕒 1 min read
मुंबई : सिंधदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 30 डिसेंबर रोजी पार पडली. आज सकाळीच मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या राऊंडमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून सतीश सावंत पराभूत झाले आहेत. भाजपला या निवडणुकीत मोठ यश मिळालं आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही निवडणूक दहशतीमध्ये झाली आहे. निवडणुका मर्यादित सदस्यांच्या असतात. आरोप, प्रत्यारोप, मारामारी, दहशतीचे वातावरण या सगळ्यात ही निवडणूक पार पडली आहे. त्याचा निकाल आज लागला आहे, पुढे विश्लेषण होईलच, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, जिल्हा बँकच्या 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळीच मतमोजणीला सुरु झाली असून राणे आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माध्यमिक शिक्षक पतपेढीत ही मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीचा निकाल यायला जवळपास दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वस्तू व सेवाकर परिषद’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
- “धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती…”, निलेश राणेंची विजयावर प्रतिक्रिया
- राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु; जाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध
- ‘बेळगावच्या तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व सरकारने…’, शिवसेनेचे टीकास्त्र
- ‘त्या ‘उपऱ्या’ भाजप आमदारासाठी फडणवीसांसह संपूर्ण भाजप….’, राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
