🕒 1 min read
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांचे बंधू विजय वरपुडकर पुढच्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे परभणीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना दिली आहे.
परंतू आता परभणी जिल्हामधील सर्व तालुक्यातील विविध पक्षांमधील किमान दोन दोन नेते भारतीय जनता पक्षामध्ये दाखल होणार आहेत. शनिवारी विजय वरपूडकर यांनी तसेच त्यांचे चिरंजीव एैश्वर्य हे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजप पक्ष श्रेष्ठींच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. ही पोस्टफेसबुक वर टाकल्याने दिवसभर चर्चेला उधान आले होते. विजय वरपूडकर हे पाच वर्षापासून सक्रीय राजकारणापासून कोसो दुर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदही त्यांच्याकडे होते. या दिग्गज नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याचे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, हे मात्र नक्की.
परंतू मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर ते बंधू आमदार सुरेश वरपूडकर यांच्या सोबत कुठेही सक्रीय राजकारणात दिसलेच नाही. काही दिवसांपूर्वी अंतर्गत कलहातूनच पक्ष बदलाचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. या मुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विजय वरपूडकर हे भाजपमध्ये दाखल होणार आहेत. वरपूडकर यांच्या सोबतच जिल्हातील सर्व तालुक्यातील नेते, पदाधिकारी देखील भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती देखील आहे.
जिल्ह्यातील राजकारणाची समिकरणे खुप विचीत्र आहेत. राष्ट्रवादी तसेच काँग्रेससह शिवसेनेत स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी सोयीच्या दृष्टीकोनातून नेहमी तडजोडीच्या भुमिका घेत आहेत. यामुळे आपली गोची होत असल्यानेच आपण आगामी काळात राजकारणामध्ये अधिक सक्रिय होण्याच्या दृष्टीकोनामधून भाजपमध्ये सक्रीय होणार असल्याचे विजय वरपूडकर यांनी या वेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही मंत्री मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत’, मेटेंचा गंभीर आरोप
- धक्कादायक! अनुकंपा नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, समाजकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हा
- बीड डीसीसी निवडणूक; मातब्बर रिंगणात उतरल्याने चुरस वाढली
- घाम पुसण्यासाठी मास्क खाली केला तरी होतोय दंड!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

