Share

धक्कादायक! अनुकंपा नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, समाजकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हा

Published On: 

🕒 1 min read

लातूर : अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर याच्याविरोधात विनयभंग तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, लातूर शहरातील एका शिक्षण संस्थेमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, नियुक्ती पत्र देण्यात यावे, या मागणीसाठी पीडिता आणि तिची आई २००७ पासून समाजकल्याण विभागात प्रयत्नशील आहेत. संबंधित खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक असलेल्या पीडितेच्या वडिलांचे २००७ मध्ये निधन झालं. त्यानंतर पीडितेच्या आईने शिपाई पदावर नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रयत्न केले होते. मात्र त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. दरम्यानच्या कालावधीत पीडितेने शिक्षक पदासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अनुकंपा तत्त्वावर आपणाला विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठी प्रयत्न केले.

त्यासाठी प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली हाेती. सदर मुलगी या जागेसाठी पात्र हाेती, संस्थेकडे जागाही रिक्त होती. मात्र, नियुक्तीसाठी खमितकर हे सतत टाळटाळ करीत होते. मुलीची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे माहीत असतानाही खमितकर यांनी २२ जानेवारी रोजी सायंकाळी कार्यालयात बोलावून शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!