Share

उमेदवारी दाखल करण्यासाठी वरळी ते परळी उमेदवारांचा धुमधडाका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही सर्व पक्ष थंड असल्याचं सुरुवातीला पहायला मिळालं. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची लगबग सुरु आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिलीचं व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. आदित्य आज वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

बीडमध्ये ग्रामीणविकास मंत्री पंकजा मुंडे या भाजपकडून, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने बहिण – भावाकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. सोलापूर मध्य मतदारसंघातून कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कर्जत जामखेड मतदारसंघातून पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवार हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर सातारा लोकसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे देखील आज अर्ज दाखल करतील. यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत.

कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उमेदवारी दाखल करणार आहेत. पाटील यांच्या उमेदवारीने स्थानिक भाजप नेते नाराज असल्याचं दिसून येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!