Share

पुलवामाच्या स्मृतीत आर्मीने शेअर केला व्हिडिओ, पाहून तुमच्याही डोळ्यात तरळतील अश्रू

Published On: 

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा आज दुसरा स्मृतिदिन आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी CRPFच्या ताफ्यावर हल्ला करून स्फोटकांनी भरलेल्या कारने धडक दिली होती. या हल्ल्यात सीआरपीएफच्या बसमध्ये स्फोट होऊन तब्बल 40 जवान शहीद झाले होते, तर 70 जवान गंभीर जखमी झाले होते.

भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने ट्विटरवर 1 मिनिटे 42 सेकंदांची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली असून या घटनेची माहिती पूर्ण माहिती त्याद्वारे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. या अपघातात ठार झालेल्या सैनिकांना अनोखी श्रद्धांजली आर्मीने वाहिली आहे. क्लिपच्या शेवटी म्हटलेय की, बिठाकर पास बच्चों को जो कल किस्से सुनाता था, उसे किस्सा बनाने को, क्या जायज़ ये धमाका था..
पहुंचा घर जो उसके था वो ताबूत था खाली, उठा जो उसकी चौखट से बहुत भारी जनाज़ा था..
ग्राफिक्सवर तयार केलेल्या या क्लिपच्या बॅकग्राउंडला ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ हे गाणे वाजत आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ खूपच खास आणि मार्मिक बनला आहे.

आदिल अहमद डार हा 20 वर्षांचा आत्मघाती बॉम्बर होता या घटनेमागे होता. आदिलचे घर घटनास्थळापासून केवळ 10 किमी अंतरावर होते. त्या दिवशी सीआरपीएफचा ताफा जम्मू ट्रान्झिट कॅम्पहून अनंतनागकडे जात होता, परंतु मधल्या वाटेतच लेथपोरामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्याचा कट पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आखला होता. सीआरपीएफ बसला लक्ष्य करण्याची कल्पना काकापोरा येथील एका दुकानदाराची असल्याचे तपासात समोर आले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणात एनआयएने 13 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात एकूण 19 आरोपींची नावे आहेत, त्यापैकी 6 ठार झाले आहेत. तर 13 जिवंत आरोपींपैकी मुख्य सूत्रधार मौलाना मसूद अझहर आणि त्याचे दोन भाऊ अद्याप जिवंत आहेत. या हल्ल्यासंबंधी पुरावे गोळा करताना राष्ट्रीय तपास संस्थेने अमेरिकन एजन्सी एफबीआयचीही मदत घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!