Share

VIDEO: धोनी पुन्हा मेंटॉरच्या भूमिकेत ‘या’ अंडर १९ स्टारला शिकवत आहे ‘हेलिकॉप्टर शॉट’!

Published On: 

मुंबई: महेंद्रसिंह धोनीने आयपीएल २०२२ साठी जोरदार तयारी सुरू आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी २० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक चेन्नईने आयपीएलपूर्वी सुरतमध्ये सराव शिबिरही सुरू केले आहे. जिथे कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह इतर अनेक खेळाडू सराव करत आहेत. अशा परिस्थितीत धोनीकडे अंडर-१९ भारतीय संघाचा स्टार राजवर्धन हंगरगेकर यांचा मार्गदर्शक म्हणूनही पाहिले जात आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सूरतमधील सराव शिबिरात घाम गाळत आहे. नुकताच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी लांब षटकार मारत होता. आगामी आयपीएलमध्ये धोनी आपल्या जुन्या अवतारात दिसेल, अशी चाहत्यांना आशा आहे. यासोबतच धोनी राजवर्धन हंगरगेकरला वरिष्ठ खेळाडू म्हणून मार्गदर्शन करताना दिसत आहे, जो नुकताच वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकलेल्या संघाचा भाग होता. राजवर्धनने (rajwardhan hangargekar) विश्वचषकात आपल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. अशा परिस्थितीत आता धोनीही त्याला लांब षटकार कसे मारावे यासाठी मार्गदर्शन करत आहे.

https://twitter.com/CSKFansArmy/status/1501797905367248897?s=20&t=VcZPR7h0tl_fo7duvh883w

राजवर्धन आणि धोनीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे धोनीच्या मार्गदर्शनानंतर, त्याच व्हिडिओमध्ये राजवर्धन चांगल्या बॅट फ्लोसह लांब षटकार मारताना दिसत आहे. राजवर्धन हंगरगेकरला यंदाच्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये मध्ये चेन्नई सुपर किंग्सने १. ५ कोटी रुपये देऊन खरेदी केले होते. आता हा धमाकेदार युवा अष्टपैलू खेळाडू IPL 2022 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली कहर करताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!