Share

IND vs SL: चाहत्यांसाठी खुशखबर! बंगळुरू येथे होणाऱ्या डे नाईट कसोटीसाठी मैदानावर १००% प्रेक्षकांना परवानगी

Published On: 

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना बंगळुरू येथे सुरु होणार आहे. डे नाईट असलेल्या या सामन्यासाठी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने १००% प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाची कमी होणारी स्थिती पाहता त्यांनीही निर्णय घेतला आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर क्रिकेट स्टेडियम भरलेले दिसणार आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने याबाबत माहिती देताना सांगितले ” १२ ते १६ मार्चदरम्यान होणाऱ्या डे नाईट कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे. प्रतिसादाची मोठी संख्या लक्षात घेऊन आणि प्रेक्षकांसाठी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे, KSCA स्टेडियमच्या पूर्ण क्षमतेसाठी तिकिटांची विक्री सुरू करणार आहे,” KSCA कोषाध्यक्ष विनय मृत्युंजया यांनी एका निवेदनात म्हटले आहे. प्रतिदिन तिकिटांची किंमत अनुक्रमे १२५० रुपये (ग्रँड टेरेस), ७५० रुपये (ई-एक्झिक्युटिव्ह), ५०० रुपये (डी कॉर्पोरेट) आणि १०० रुपये ठेवण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीत, जी विराट कोहलीची (virat kohli) १०० वी कसोटी देखील होती, मोहालीच्या PCA स्टेडियममध्ये ५० % गर्दीची क्षमता होती. तेव्हा बीसीसीआयने प्रेक्षकांना आधी परवानगी नाकारली होती. मात्र चाहत्यांच्या मोठ्या प्रतिसादानंतर ५०% प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. कोरोनानंतर जवळपास २ वर्षांनी भारतीय क्रिकेट संघाला चिअर करण्यासाठी स्टेडियम गजबजलेले दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!