Share

IPL 2022 : स्लिंगा इज बॅक..! मुंबई इंडियन्स नव्हे, तर ‘या’ संघात मलिंगा झाला दाखल

Published On: 

मुंबई: स्लिंगा मलिंगाची आयपीएलमध्ये वापसी होत आहे. मात्र यावेळी मुंबई इंडियन्स नव्हे तर मलिंगाची राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही बातमी अधिकृत केली आहे. T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मलिंगाने मुंबईला रामराम करत राजस्थानला ‘घनी खंबा’ म्हटले आहे.

पाच वेळा IPL चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (mumbai indians) तो महत्त्वाचा भाग होता. १२२ सामन्यांमध्ये १७० बळी मिळवण्याची त्याची संख्या अजूनही लीगच्या इतिहासात सर्वोच्च आहे. त्यामुळे, राजस्थान रॉयल्सच्या सपोर्टमध्ये त्याचा समावेश मोठे बळ देणारे ठरणार आहे. दरम्यान, राजस्थानने  (rajasthan royals) मलिंगाचे स्टाईलमध्ये स्वागत केले. “किसेस द बॉल. लसिथ मलिंगा (lasith malinga). आयपीएल. गुलाबी,”असे रॉयल्सने लिहिले, त्याखाली त्यांनी मलिंगचा बॉलिंग कोच म्हणून पिंक जर्सीत ग्राफिक केलेला फोटो टाकला आहे.

आयपीएलमध्ये मलिंगा आता त्याचा माजी श्रीलंकेचा सहकारी कुमार संगकारा यांच्यासोबत सैन्यात सामील होईल, जो फ्रँचायझीमध्ये क्रिकेट ऑपरेशन्सचा संचालक आहे. बॉलिंग कोच मलिंगा ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी आणि प्रसीध कृष्णा या सारख्यांना गोलंदाजांना मदत करणार आहे. एकूणच, राजस्थानचा संघ कागदावर पूर्णपणे तयार झालेला दिसतोय. यंदा राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन करेल. २६ पासून आयपीएल स्पर्धेची सुरुवात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!