🕒 1 min read
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar,) आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी अजित पवारांनी हवेलीत छत्रपती संभाजी राजेंचे स्मारक (memorial of Chhatrapati Sambhaji Raje) उभारणार असल्याची घोषणा केली आहे. सोबतच आरोग्याबाबतीतही त्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
आता नियमित अर्थसंकल्पीय निधी व्यतिरिक्त येत्या तीन वर्षांत आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च (11000 crore to be spent on health services) करण्याचा संकल्प महाविकास आघाडी सरकारने समोर ठेवला असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. दरम्यान कोविड काळात मविआ सरकरने केलेल्या कामाचे जगभर कौतुक झाले असल्याचेही ते म्हणाले आहेत.
तसेच ८ मार्च २०२२ पर्यंत राज्यात ८ कोटी ७४ लाख लोकांना कोरोना प्रतिबंधकची पहिली मात्रा देण्यात अली आहे. तसेच ६ कोटी ७८ कोटी लोकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. आतापर्यंत १५ लाख ८७ जणांना लसवर्धक मात्रा देण्यात आली असल्याचे अजित पवारांनी सांगितले. यावेळी त्यांनी कोविड योध्यांचेही कौतुक केले. याशिवाय संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींचा निधी, महसुल विभागासाठी ५०० कोटींची तरतुद, ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नव्या आयोगाची स्थापना आणि तृतीय पंथीयांना नवीन ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
हवेलीत छत्रपती संभाजी राजेंचे स्मारक उभारणार; अजित पवारांची घोषणा
-
‘हे सरकार खरं हिंदुत्ववादी असेल तर….’ – चंद्रकांत पाटलांचे आव्हान
-
सोयाबीन दरात वाढ; शेतकऱ्यांचा भर साठवणूक केलेल्या सोयाबीन विक्रीवर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
