मुंबई : क्रिकेट जगतात सगळीकडे उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना २ दिवसानंतर सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
डब्ल्युटीसीच्या अंतिम सामन्यापुर्वी न्युझीलंडच्या संघाने इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्याची मालिका खेळली आहे. या मालिकेत न्युझीलंडच्या संघाने १-० असा विजय मिळवला होता. मात्र हा विजय भारताविरुद्धच्या सामन्यात काही कामाचा नाही असे न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने म्हणले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले. मुलाखतीवेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला की, ‘इंग्लंडविरुद्ध मिळालेल्या विजयाचा भारताविरुद्धच्या सामन्यात फायदा होईल का?’ असा प्र्श्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना बोल्टने ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर नाही. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचा भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी काहीच फायदा होणार नाही.’ असे उत्तर दिले.
मात्र यावेळी बोलताना ट्रेंट बोल्ट या सामन्यात झालेली तयारी कधीही चांगलीच असेही म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात न्युझीलंडच्या संघाने वर्चस्व गाजवले मात्र हा सामना इंग्लंडचा संघ अनिर्णीत राखण्यात यशस्वी झाला. मात्र दुसऱ्या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने इंग्लंडवर चौथ्याच दिवशी मात करत २२ वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय साजरा केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन’, जिल्हाधिकारी जगताप यांची तंबी
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

