बीड: येथील एका रेशन दुकानदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी (ता. १५) दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. दिवसभरात लाच प्रकरणी शहरात तिघांवर गुन्हे नोंद झाले. तीनही गुन्हे बीड शहरात दाखल झाले या आश्चर्याची बाब म्हणजे यातील दोघे तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागातीलच आहेत.
एका धान्य दुकानदाराला शासनाकडून दर महिन्याला निर्धारित केलेले धान्य नियतन मिळत नव्हते. याबाबत संबधिताने पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगे याच्याकडे पाठपुरावा केला. मात्र मंजूर नियतन देण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच ठाणगे यांनी त्या दुकानदाराला मागितल. पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयातच सापळा रचण्यात आला.
रेशन दुकानादाराकडून लाचेचे दहा हजार रुपये स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने निरीक्षक रवींद्र ठाणगेला पकडले. दरम्यान, माजी सैनिक असलेल्या ठाणगेचा पैसे घेतानाचा व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढला होता. अखेर तो लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अलगद अडकला. उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महत्त्वाच्या बातम्या
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- आज राज्यात १५,१७६ रुग्णांनी केली कोरोनावर मात तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- राहुल गांधींची वादग्रस्त प्रकरणी टीका आणि योगींनी संतापात राहुल गांधींची लाजच काढली !
- शासनाने दिलेला निधी कुठे कुठे खर्च झाला? ,औरंगाबाद महापालिकेत जुळवाजुळवीला सुरुवात
- ठरलं तर ! राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
